‘…पर हम झुकेंगे नहीं !’; ईडीच्या कारवाईवर राऊतांचे ‘पुष्पा’ स्टाईलने उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी ईडीने अटक केली. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यवर कारवाई करण्यात आली. या प्रकरनावरून आज संजय राऊत यांनी ट्विट करीत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल.पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत केंद्र सरकावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून ‘आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले, जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल..पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे पुष्पा चित्रपटातील ‘झुकेंगे नहीं’ हा डायलॉग मारत राऊत यांनी टीका केली आहे.

दरम्यान, राऊत यांनी आज माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. मोदी सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करते. आम्ही त्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू. त्यांना काय सर्च करायचे आहे ते सर्च करू द्या. मी त्यांना विचारतोय ‘कुछ मिला क्या?’ हा खेळ असाच सुरू राहणार, अशी टीका राऊत यांनी केली.

Leave a Comment