हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेचे तोंडभरून कौतुक केले. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे असं म्हणत आगामी निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?’ असा घणाघात भातखळकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.
विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 10, 2021
काय म्हणाले होते शरद पवार ?
शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. अस शरद पवार यांनी म्हंटल होत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.