आदित्य ठाकरेंना दाखवा आणि लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांची ऑफर

0
91
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते वादळामुळे मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे मुंबईकरांच प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु नुकसान ग्रस्तांना अद्याप हवी तशी मदत मिळाली नाही. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी घोषणा अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून एका व्हिडीओद्वारे ही घोषणा केली. मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली या परिसरातील मच्छिमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. परंतु सरकार कडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

गेल्या वर्षभरात आदित्य ठाकरे यांनी अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडफडून, होरपळून मृत्युमुखी पडणाऱ्या मुंबईतील रुग्णांकडे ढुंकूनही पाहिले नाही. आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयाला भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा सवालही भातखळकरांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here