नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…; भाजपाचा टोला

rahul gandhi nana patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला शह देण्यासाठी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी प्रत्येक जण आपापला पक्ष कसा वाढेल यावर भर देत आहेत. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणूकाबाबत स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता भाजपने नाना पटोले आणि राहुल गांधींना टोला लगावला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की , नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे,” अशा शब्दात भातखळकरांनी टोला लगावला आहे.

 

नाना पटोले नेमकं काय म्हणाले-

शरद पवार भाजपाविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. भाजपामधून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, तसेच आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल,” असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.