Wednesday, February 1, 2023

किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? टोपेंच्या ‘त्या’ विधानाचा भाजप कडून धिक्कार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विरार येथील वल्लभ कोव्हीड हॉस्पिटल मध्ये भीषण आग लागली. तब्बल १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. दरम्यान विरार दुर्घटना हि काय राष्ट्रीय बातमी नाही असे बेजबाबदार विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टोपेंना खडेबोल सुनावले आहेत. किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी असे महंत अतुल भातखळकर यांनी टोपेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो. असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं 

- Advertisement -

नक्की काय म्हणाले होते राजेश टोपे-

आपण रेमडेसीवीर बाबत बोलू शकतो. ऑक्सिजन बाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असं धक्कादायक विधान राजेश टोपे यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.