हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यावरून विरोधी पक्ष भाजप सरकार वर निशाणा साधत आहेत. दरम्यान बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय” असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी जोरदार टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून निशाणा साधला आहे. “ऑक्सिजन नसल्यामुळे कांदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
अतुल भातखळकर यांनी याआधीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं” असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.