वाझे की लादेन? संबंधीतांनी जनतेला उत्तर द्यावं; भाजप आक्रमक

sachin vaze 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आता ATS देखील म्हणते हिरेन मनसुख यांच्या संशयित मृत्यूत सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा आहे. मग आत्तापर्यंत विधिमंडळात आणि बाहेर सचिन वाझे यांची वकिली कोण आणि का करत होतं? याचे उत्तर संबंधितांनी जनतेला द्यावे असं म्हणत वाझे की लादेन असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. सचिन वाझे प्रकरणी भाजप आता अजूनच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group