जनतेचे तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत; भातखळकर आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामासाठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी सरकार वर निशाणा साधला.

जनमताचा विश्वासघात करून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री आता जनतेवर बुलडोझर फिरवतायत, फक्त चमकोगिरीसाठी… जनतेचे तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत. असे ट्विट भातखळकर यांनी केले.

कुरारची कारवाई ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी आहे. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू,’ असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.