संजय राऊतांची मनस्थिती सध्या ठिक नाही ; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने सामना अग्रलेखातुन भाजपवर आपल्या खरमरीत शब्दात टीका करत असतात. नुकतेच केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील त्यांनी मोदी सरकारचे कान टोचले होते. यावरून आता भाजपचे नेते अवधुत वाघ यांनी राऊतांवर टीका केली आहे.

आजकाल सामना हे शिवसेनेचे मुखपत्र कमी व भाजपाच्या नावाने शिमगा करणारी पत्रावळ जास्त वाटते. संजय राऊत माझे मित्र आहेत पण सध्या त्यांची मनस्थिती ठिक नाही असे वाटते असे ट्विट अवधूत वाघ यांनी केलं.

दरम्यान संजय राऊत यांनी नुकतच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून भाष्य करताना म्हंटल होत की भागवत कराड यांना मंत्रिपद देने याचा अर्थ पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय खळबळ उडाली होती तसेच अनेक तर्क वितर्क लढवले गेले.

Leave a Comment