Sunday, June 4, 2023

मुस्लिम फक्त खातात आणि मुले जन्माला घालतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून निवडणूक प्रचारात धार्मिक रंग दिसताना पाहायलं मिळत आहेत. भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री बलदेवसिंग औलख यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम फक्त खातात आणि मुले जन्माला घालतात असे विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे

मुस्लीम लोक मुले निर्माण करण्याचे काम आधीच करत आहेत, त्यांना कोण रोखत आहे, त्यांचे फक्त खाणे, पिणे आणि मुले जन्माला घालणे हेच काम आहे. मुलांना शिकवणे आणि त्यांना चांगले वाढवणे हा त्यांचा विचार नाही असं म्हणत त्यांनी मुस्लिम समाजावर टीका केली आहे

भाजप सरकार कोणताही भेदभाव न करता प्रत्येक समाजातील मुलांना अधिक शिक्षण देण्याचे काम करत आहे असे म्हणत त्यांनी आपल्या सरकारचे मात्र कौतुक केलं तर मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यास विरोध करणारे लोक मुलींचा अपमान करत आहेत असेही त्यांनी म्हंटल. हे त्याच पक्षाचे नेते आहेत ज्यांचे प्रमुख मुलायम सिंह बलात्कार प्रकरणात मुलं आहेत, मुलं चुका करतात, असं विधान करतात असे म्हणत त्यांनी मुलायम सिंग यांच्यावर निशाणा साधला