मोदींचा ‘सुदामा’ हरला : ‘या’ ठिकाणी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉझिट झालेय जप्त

0
88
Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 27 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात भाजपाने या 27 पैकी 24 जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. वाराणसी-चंदौली-भदोही जागेवर भाजपाचे उमेदवार सुदामा पटेल हरले आहेत.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने 36 पैकी 33 जागा जिंकल्या आहेत. मात्र, तीन गमावल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी येतो. यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. माफिया आणि एमएलसी बृजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह अपक्ष म्हणून तिथे निवडून आली आहे.

विशेष म्हणजे भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉझिटही गमवावे लागले आहे. वाराणसी-चंदौली-भदोही सीटवर भाजपाचे उमेदवार सुदामा पटेल हरले असून अन्नपूर्णा सिंह यांना 4 हजार 234 मते मिळाली तर भाजपाला 170 मते मिळाली हेआहेत.

प्रतापगढ़ मतदारसंघातदेखील भाजपाला पराभव मिळाला आहे. भाजपाचे माजी आमदार हरिप्रताप सिंह यांना राजा भैयाच्या पक्षाचे उमेदवार गोपाल भैया ने पराभूत केले आहे. आमगढ़मध्ये देखील अपक्ष उमेदवार विक्रांत सिंह रिशू जिंकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here