भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा सनसनाटी आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या प्रचारार्थ गोव्यात आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजप कडून फक्त आम्हांला च नव्हे तर संपूर्ण एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळे ते सर्व मित्र पक्ष भाजपला सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढत आहोत. मणिपूरमध्ये लढत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये लढलो. सिल्वासामध्ये विजय मिळाला असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. शिवसेना गोव्याला नवीन नाही.. तसेच इतर राज्यातही शिवसेनेची गरज आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटल.

Leave a Comment