हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडीतील मतांतरे उघड झाले आहे. त्यामुळे नामांतरासाठी नेहमी आग्रह धरणारी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन टीका केली आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती.
फडणवीसांनी केला ‘हा’ आरोप –
शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो,असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’