हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नी संभाजी राजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे शांत राहून सरकारला मदत करण्याची त्यांची कृती आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंची कृती ही सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण मिळवण्याची असल्यास आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत आहोत अस मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं.
कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन हाताने खाणं सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही, असं ते म्हणाले.
रिव्हू पेटिशन दाखल करा, ज्या दोन वर्षांत कायदा होता त्या तरुण तरुणींना नोकऱ्यांची लेटर्स द्या, आरक्षण मिळेपर्यत सवलती द्या,मागास आयोग नेमा,अशा मागण्या आम्ही केल्या होत्या त्याच मागण्या संभाजीराजेंनी पुन्हा केल्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.