फडणवीसांवर मराठा आरक्षणाचे खापर फोडू नका; चंद्रकांतदादांचे अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला सुनावलं. याचबरोबर मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत करावी, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली मला हे लक्षात येत नाही आहे की, खरच त्यांना कायदा कळत नाही आहे का ते समाजाची दिशाभूल करत आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख त्यांच्या पत्रकार परिषदेत केला आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे मागास आयोगाच्या माध्यमातून आणि मागास ठरवल्यानंतर त्याला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहेत बाधित झालेले नाहीत त्यांना कायदा करता येतो हे केंद्रामध्ये ज्यावेळी लोकसभा आणि राज्य सभा मध्ये कायदा मांडण्यात आला त्यावेळी पारदर्शकपणे मांडले.

अशोक चव्हाण यांना कायदा कळत नाही, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते आता वेड पांघरून पेडगावला जात आहे. ते आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. इतके वर्ष केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र राज्य सरकार याबाबतीत जबाबदारी झटकू शकत नाही. आताही चेंडू तुमच्याच अंगणात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे चेंडू ढकलून तुम्ही मोकळे होऊ शकणार नाही, असंही पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment