आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे; चंद्रकांतदादांचं प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा मैत्री होईल का यावरून आरोप – प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. मैत्री कोणाशी करायची हे वाघ ठरवतो अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारल्या नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पुणे येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान यावेळी त्यांना संजय राऊतांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल देखील विचारलं असता चंद्रकांत दादांनी  संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता असा टोला त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment