हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही; चंद्रकांतदादांचा राऊतांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात खडाजंगी होताना दिसत नाही. आम्ही पाठीमागून वार करत नाही तर समोरून कोथळा काढतो अस संजय राऊत यांनी म्हणल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

चंद्रकांत पाटील आज जालन्यात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राऊतांवर पलटवार केला. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, असं पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आम्ही एवढे कमजोर नाहीत. संजय राऊत आम्ही एवढे कमजोर नाही. आम्ही सज्जन आहोत. सुसंस्कृत आहोत. हम किसी को टोकेंगे नही, यदी किसीने टोका तो छोडेंगे भी नही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment