संजय राऊतांनाच गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा ; चंद्रकांत पाटलांचा टोला

sanjay raut and chandrakant dada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत भर पडली असून राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सरकारची बाजू मांडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा, त्यांच्याशिवाय मंत्रीमंडळामधील कुणीच मंत्री बोलत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. हळूहळू सत्य बाहेर येत असून लवकरचं सरकारचा बुरखा फाटणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत –

तुमच्याकडे पुरावा असेल, काही माहिती असेल तर ती द्या. हवेत तीर मारू नका. थेट बोला, असं संजय राऊत यांनी म्हंटल होत. तसेच कोणत्या राज्यात कोण वसूली करतं हे सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी वसूली इंचार्ज कोण होतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलू नये. हमाम में सब नंगे है, असं राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हांला 7972630753 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News