हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला नऊ पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
मात्र, चंद्रकांत पाटील यांनी मात्र हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं सांगतानाच एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे, असं पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि निलेश राणे यांना देखील स्वतःच्याच गावात पराभवाचे तोंड पाहावे लागले. दरम्यान राज्यात आम्ही सहा हजार पेक्ष्या जास्त ग्रामपंचायती जिंकू बसा विश्वास भाजप नेते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’