वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल ; चंद्रकांतदादांचं रश्मी ठाकरेंना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या सामना अग्रलेखातील त्यांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह भाषेबद्दल सामना संपादिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. वहिनी, मला खात्री आहे आपणालाही ही भाषा आवडत नसेल, असं या पत्रात चंद्रकांत पाटलांनी म्हंटल आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!”

“वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल.”

“आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा,” असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

https://www.facebook.com/1503863456597524/posts/2759574504359740/

दरम्यान, चंद्रकांतदादा रश्मी ठाकरे यांना पत्र लिहित असतील तर ताबडतोब लिहा. बापरे, ते पत्रं लिहित आहेत. मला त्याची भीती वाटते, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. चंद्रकांतदादा ‘सामना’ वाचतात ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते ‘सामना’ वाचत नव्हते. आज वाचतात. चांगलं आहे. त्यांनी ‘सामना’ रोज वाचला पाहिजे. असेही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment