अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

2
46
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । वाल्मिक जोशी

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमधील सर्वात जास्त चर्चेचा आणि नाट्यमय घडलेला विषय म्हणून जाची गणना केली जाईल तो विषय म्हणजे भाजपचे जळगाव मधील तिकीट वाटप. जळगावच्या आपल्या बालेकिल्ल्याला धक्का बसू नये म्हणून भाजप आतोनात प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या जागी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे आधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट दिल्याने खळबळ उडाली आहे. आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाने कामाला लागण्याचे आदेश दिले असून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपची पहिल्यापासून संभ्रमाची स्थिती असल्याचे दिसून आले आहे. खासदार ए.टी. नाना पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित असताना सोशल मीडियातील कथित आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे ए.टी. नानांना उमेदवारी नाकारण्या आली. तथापि, ऐन वेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला. खुद्द ए.टी. नानांनी वाघ सोडून अन्य उमेदवार चालणार असल्याचे जाहीर केले. तर अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही वाघ यांना विरोध केला. यामुळे अखेर आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान उन्मेष पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपच्या या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात टक्कर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here