हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. याबाबत चिपळूणचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे थोड्यावेळात आपला दौऱ्याला सुरुवात करतील. आम्हाला उत्तर द्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यानी ठाकरी भाषेत द्यावे. राणेंना अटक झाली तर महाराष्ट्र्भर जेलभरो आंदोलन केले जाईल. मंत्री राणें राणेंना अटक करण्याची शिवसेनेची हिंमत नाही. त्यांनी ती करूनच दाखवावी, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष जठार यांनी दिला.
मंत्री राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक नुकतेच रवाना झाले आहे. मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याने पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले. याबाबत चिपळूण भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राणेंची भाषा हि ठाकरी भाषा आहे. जर गुन्हा दाखल करायचा असेल तर प्रत्येक दसऱ्याच्या मेळाव्यावर गुन्हा दाखल करावा. उद्धव ठाकरे यांना प्रजासत्ताकदिन कितवा आहे. हे जर माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.