हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे चित्रा वाघ यांनी म्हंटल.
गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. हे सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलाय.
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
मी @maharashtra_hmo ना आवाहन करतीये..तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. pic.twitter.com/5wp3sI0hCN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 19, 2021
सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले-
गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हंटल होत की, गेली 30 वर्षे ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं.