हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवर भाष्य करत केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली होती. त्यावर आता भाजप नेत्या यांनी चोख प्रत्युत्तर देत संजय राऊत यांचा उल्लेख सोनिया सेनेचे प्रवक्ते असा केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो… हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.
सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते
संजय जी राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे (१/२) @rautsanjay61 pic.twitter.com/tbGdDYfev6— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 18, 2021
आपणास असं खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मा.मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही, असे त्यांनी म्हंटल
संजयजी राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत. आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे… जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते.. या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा, असे खोचक टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहेत