हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाई वरून भाजपवर निशाणा साधला होता. केंद्रीय तपस यंत्रणेला आणि किरीट सोमय्या याना काश्मिरात पाठवा असा टोला राऊतांनी लगावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला
सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले… याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही.. ‘जैसी करणी, वैसी भरणी… असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं
सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले…
याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे
आता आदळआपट करून उपयोग नाही..
‘जैसी करणी, वैसी भरणी…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 18, 2021
महाविकास आघाडी सरकारला IT आणि ED ची एवढी भिती का वाटतीये?? सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय.. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
. #MVA ला #IT आणि #ED ची एवढी भिती का वाटतीये
सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’दिसतंयकेंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय..
हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 18, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले-
ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.