प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी; काँग्रेसने केलं समर्थन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून, महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे चित्र वाघ यांच्या भूमिकेला काँग्रेसने समर्थन केले आहे. गेल्या वर्षी भाजपमध्ये सामील होऊन सुद्धा त्या या आपले ‘संस्कार’ विसरल्या नसल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.”

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या भूमिकेचे महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रमुख सत्यजित तांबे यांनी स्वागत केलं आहे. चित्र वाघ यांच्या ट्विटवर तांबे म्हणाले कि, ”चित्राताई, आपण एक महिला नेत्या म्हणून पक्षीय जोडे बाजूला ठेवून घेतलेली भूमिका स्वागतार्ह्य आहे. मात्र आपलं बोलणं निर्लज्ज योगीनाथ ऐकतील का ? हा प्रश्न मात्र आहेच. पण एक मात्र खरं, पक्ष बदला असला तरीही तुम्ही तुमचे संस्कार व विचार विसरला नाहीत ह्याचा अभिमान आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment