हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी मुंबईला पळ काढणारे पालकमंत्री अनिल परब हे पळपुटेमंत्री आहेत अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न- पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात… अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!!, अशी टीका चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक
अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी @advanilparab रात्रीतून मुंबईला पळ काढतात (१/२) pic.twitter.com/h8oIWuIk6C— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 24, 2021
दरम्यान चिपळूण मध्ये पावसामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या चिपळुणात पाणी ओसरत असले तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा शहरात पूरस्थिती होण्याची भीती आहे.