मी काय आहे अन काय नाही, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा; चित्रा वाघ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा उल्लेख केला होता. आता महेबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी वाघ आहे वाघ., कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा’, अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नगरमध्ये भाषणादरम्यान चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली होती.

शेख यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे. ‘सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले, आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. वाघ आहे मी लक्षात ठेवा..कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. मी काय आहे अन काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या,’ अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महेबूब शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.