Monday, January 30, 2023

भाजपच्या नगरसेविकेची आर्वाच्य भाषेत शिवीगाळ, छ. उदयनराजेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

भाजपच्या नगरसेविका व बाधकाम सभापती सिध्दी पवार यांची आर्वाच्य भाषेत शिवीगाळ ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून ती क्लिप माझीच असल्याचेही त्यांनी व्हिडिओहीद्वारे सांगितले आहे. यावर खासदार छ. उदयनराजे भोसले शासकीय कामात अडथळा करत असेल तर मुख्याधिकारी यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे.

- Advertisement -

भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी ठेकेदाराच्या व्यवस्थापनाला तसेच मुख्याधिकाऱ्यांना फोनवरून एका प्रभागातील काम सुरू असताना एका अपार्टमेंटच्या पडलेली भिंत पुन्हा बांधण्यावरून नगरसेविका सिद्धी पवार यांनी अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप बद्दल खा. श्री. छ. उदयनराजे म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने वागावे काम करताना अडचणी तर येणारच हि ऑडिओ क्लिप वायरल झाली ही खुप दुर्दैवी घटना आहे. जाणून बुजून केल जात नाही, जरी झाल तरी ठेकेदाराने ते भरुन देणं गरजेच आहे. आम्ही किती कार्यरत आहोत हे दाखवण्यासाठी अस बोलण अशोभनीय आहे. तुम्हाला निवडून दिल आहे, ते काम करण्यासाठीच दिल आहे. विकास काम होत असताना जर कोणी शासकीय कामात अडथळा करत असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत. सदस्य कुठल्याही पार्टीच असू दे प्रश्न पार्टीचा नाही, प्रश्न विकास कामे मार्गी लागण्याचा आहे.

सातारा शहराची प्रतिमा मलिन करू नये

ही ऑडिओ क्लिप सातारा पुरती मर्यादित असती, तर ठीक होतं. अशा पध्दतीन बोलणे आणि ते एका स्त्रीच्या वक्तव्यामुळे सातारा शहराची नाचक्की झालेली आहे. सातारा शहराची व सातारा नगरपालिकेची प्रतिमा कृपया करून कोणीही मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही सिध्दी पवार यांचे नाव न घेता छ. उदयनराजे भोसले यांनी दिला.