हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. दरम्यान यावरून आता भाजप अजून आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ” असं फडणवीस म्हणाले आहेत.
ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं उघडकीस येत आहेत. यामधून पोलीस दलाचं खच्चीकरण होताना आपल्याला दिसत आहे. आज ही घटना म्हणजे याचा कळस आहे. दुर्देवाने इतक्या वाईट प्रकारे, ही सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर, आमचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की आता या परिस्थितीत गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group