जनतेच्या अंगावर जाणं बरोबर नाहीये; फडणवीसांनी भास्कर जाधव यांना सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना खडेबोल सुनावले आहेत.

फडणवीस म्हणाले, जनता काही तुमच्या विरोधात बोलत नसतात. त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतात. अशावेळी त्यांना चूप करणं, त्यांच्या अंगावर जाणं, हे बरोबर नाहीये. त्यांचा आक्रोश समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल हे समजून घेतलं पाहिजे,’ असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

नेमकं काय घडलं-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण च्या बाजारपेठ मध्ये पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेले असता एका महिलेने उद्धव ठाकरेंना मदत मागितली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.