ओबीसी आरक्षणाला राज सरकार जबाबदार; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदी कडे बोट दाखवत यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदी जी नी केलं अस म्हणत त्यांनी टोला लगावला. ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदींमुळे झालं, मोदींनी केलं म्हणूनच सांगितलं, की खरोखर यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील मोदीच जबाबदार आहेत. पण ये पब्लिक है, ये सब जानती है…या जनतेला माहिती आहे असेही फडणवीसांनी म्हंटल.

फडणवीसांनी सर्व ओबीसी नेत्यांना आव्हान केले की तुमची आमची दुश्मनी नाही, तुम्ही कुठल्याही पक्षात असाल, पण ओबीसीप्रती इमानदार असाल, तरी आम्ही तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे, राजकारणाशिवाय तुमच्यासोबत उभं राहायलं तयार आहे. मी दाव्याने सांगतो पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो,खऱ्या अर्थाने आमच्या हाती सूत्र दिलीत तर, मी दाव्याने सांगतो ओबीसीचं राजकीय आरक्षण परत आणू शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल