आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत, आमच्यावर काही परिणाम होत नाही – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडुन भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या सुरक्षे मध्ये कपात करण्यात आली आहे. यावर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही.” असं देवेंद्र फडणीस यांनी म्हंटल आहे. आज लोणावळा येथील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, “मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असतानाही एक साधा सुरक्षा रक्षक माझ्याजवळ नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंच्याला देखील जायचो, सगळीकडे जायचो. आज देखील मला एकही सुरक्षा रक्षक दिला नाही तरी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे आमची त्यावर कुठलीही तक्रार नाही, आक्षेप नाही.

नथुराम गोडेसेचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही –

मध्य प्रदेशमध्ये हिंदू महासभेकडून गोडसे ज्ञानाशाळा सुरू करण्यात आली. यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “नथुराम गोडेसेचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ज्याने खून केला, त्यांची हत्या केली अशा व्यक्तीचं या देशात महिमंडन होऊ शकत नाही. अशाप्रकारे जर कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चूक आहे. त्याचं समर्थन होणार नाही.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment