हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे रावसाहेब दानवेंकडे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. यावरून राजकीय तर्क वितर्क लढवले जात असून याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना भाजप युतीबाबत सस्पेंस अजून वाढवला
फडणवीस म्हणाले, राजकारणात कधी काहीही होतं. आम्ही एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. तसेच ही जे अनैसर्गिक आघाडी तयार झाली आहे, ही फार काळ टीकत नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या देखील लक्षात आलं असेल. म्हणून मुख्यमंत्री यांनी मनातली भावना बोलून दाखवली.
ते पुढे म्हणाले, भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडत आहोत. आणि हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचिक मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल, अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल .