संजय राऊतांना कामधंदा नाही, ते काहीही बोलत असतात; फडणवीसांनी फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्ती वरून राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राऊतांना फटकारले आहे. संजय राऊत यांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वल पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल! असा खोचक सल्ला ‘सामना’तून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment