संजय राऊतांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे; फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी ने छापे टाकल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत आधी अयोध्येतील राम मंदिर जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करावी असा सल्ला ईडीला दिला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राऊतांचा खरपूस समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली असून ती तेच वाजवत असतात. खरं तर अयोध्येच्या संदर्भात बोलण्याचा त्यांना अधिकार तरी आहे का असा सवाल फडणवीसांनी केला. आयोध्येच्या संदर्भात यांचं काही कॉन्ट्रीब्युशन तरी आहे का असा फडणवीस म्हणाले. त्यांनी केवळ तोंडाची वाफ दडवली. पण आयोध्ये संदर्भात लढाई लढणारे आम्ही आहोत असे फडणवीस म्हणाले.

आयोध्ये संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे आणि आज अयोध्येत राम मंदिर बनतय पण अयोध्येत प्रभू श्रीराम यांचं मंदिर बनतंय याबाबत काही लोकांच्या पोटात दुखतंय आणि आता त्यांच्या ते ओठात येत आहे असा टोला फडणवीसांनी लगावला.

दरम्यान, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली असून त्यामध्ये राजकारण नाही. देशमुख यांच्यावरील कारवाई राजकीय हेतून नाही असेही फडणवीसांनी म्हंटल.