हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळअधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून राज्यातील विविध विषयांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपकडून सुरु आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे
फडणवीस म्हणाले, नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचे केंद्र मिळाले. औरंगाबाद च्या उमेदवाराला जळगावचे केंद्र मिळाले, विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचे केंद्र मिळाले आणि एकाला तर थेट दिल्लीचे केंद्र मिळाले. त्यानंतर २ वेगवेगळ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका एकच होत्या अशी माहिती फडणवीसांनी दिली येव्हडच नव्हे तर नियुक्त्यांचे रेट देखील यांनी काढले. क गटातील नियुक्ती करिता १५ लाख रुपये, ड गटातील नियुक्तीकरिता ८ लाख रुपये दावा दलालांकडून केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला
आरोग्य भरती परीक्षेचं काम न्यासालाच का दिले ? असा सवाल फडणवीस यांनी केला. न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2021 ला अपात्र ठरवलं गेलं. त्यानंतर 4 मार्च 2021 ला हायकोर्टाच्या निर्णयानं पात्र केलं. मात्र, सरकारने चार कंपन्या डावलून न्यासाला काम दिलं. त्यानंतर आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाला. म्हाडा भरतीत घोटाळा झाला. टीईटी मध्ये घोटाळा झाला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही.न्यासानं या परीक्षेत पेपर फोडण्यापासून सर्व गोष्टी फोडण्यापर्यंत सर्व काम केली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच या सर्व प्रकरणी मंत्रालयापर्यंत तार चालली आहे. महेश बोटले याला अटक झाल्यानंतर त्याच्या झडती मध्ये लातूर आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे सह १२ जणांची माहिती मिळाली. प्रशांत बडगिरेच्या ड्राइव्हर कडे क आणि ड गटातील प्रश्नपत्रिका सीलबंद पाकिटात मिळल्या आणि ३० लाखांचा व्यवहार झाल्याचे पुरावे मांडले असे फडणवीस यांनी म्हंटल. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी उद्या आपण याच्यासाठी चर्चा लावावि अशी विनंती फडणवीसांनी केली