सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा; फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अस विधान करत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केले.

लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

मोदी सरकार शेतकऱ्यांची चिंता करतंय, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. या भागात 5 हजार कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या, 35 गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like