हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता ही भाजपची संस्कृती नाही पण जर आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडत नाही असे म्हणायलाही ते विसरले नाहीत.
फडणवीस म्हणाले, काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे.तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही.
प्रसाद लाड यांची कोलांटीउडी-
दरम्यान शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला अस म्हणत प्रसाद लाड यांनी पलटी मारली. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले.