शिवसेनेचे हिंदुत्व कागदावरचे; फडणवीसांचा पलटवार

0
29
thackeray fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेच हिंदुत्त्व कागदावरचे आहे असा टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. तुम्ही तर साधं औरंगाबाद चे संभाजीनगर करू शकला नाही.

उद्धव ठाकरे म्हणतात की 25 वर्षे युतीत सडलो. पण युतीचा निर्णय हा बाळासाहेब ठाकरे यांचा होता. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का असा सवाल फडणवीसांनी केला.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा जन्म होण्यापूर्वीच मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here