हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकरभरतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरत आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटात विद्यार्थी कसेतरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. त्यांना माघारी पाठवलं होतं. सरकारी भरतीच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, याचं गांभीर्य सरकारला नाही, अशी टीका पडळकर यांनी केली.
एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. #स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे #प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय.#BJPMaharashtra #MahaVikasAghadi #CMOMaharashtra #RajeshTope pic.twitter.com/O8q9KPFAhC
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 16, 2021
एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवत आहात. विद्यार्थ्यांचा अधिकार तुम्ही नाकारता आहात. त्यांची संधी तुम्ही नाकरत आहात. हे वसूली सरकार मुळात नोकरभरती करत नाही, आणि केलीच तर त्यामध्ये सावळा गोंधळ घालत आहे. यांच्या गलथान कारभारामुळे, यांच्या नाकर्तेपणामुळे, स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तरी देखील हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय. ” असं देखील आमदार गोपीचंद पडळकर म्हणालेले आहेत.