आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही, मी तो वाचतही नाही ; पडळकरांचा शिवसेनेवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि प्रामुख्याने पवार कुटुंबीयांवर टीका करणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही, असे सांगितले.

पडळकर म्हणाले, सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही, तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशी टिप्पणी पडळकर यांनी केली.

दरम्यान यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मनसेच्या भूमिकेचे समर्थन केले. मनसेची भूमिका योग्य आहे. कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment