हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष रणनीती आखली आहे. यामध्ये भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी थेट मैदानात उतरणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री पद असल्यामुळे ते व्यस्त असल्याचे दिसत आहेत. मात्र असे असताना ही पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठे जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या दररोज तीन सभा पार पडणार आहेत. या काळात देवेंद्र फडणवीस महायुतीच्या आमदारांनी खासदारांना घेऊन प्रचारासाठी मैदानात उतरतील. मात्र अद्याप या सभांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 45 हुन अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने मुंबई कोर कमिटीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा होणार आहे. तसेच, 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.