हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर करण्याकडे पक्षांकडून तयारी केली जात आहे. दरम्यान काल भाजपच्यावतीने 5 जागांसाठी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपने नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीनंतर बावनकुळे यांनी माझे तिकीट कापले तेव्हा मी नाराज नव्हतो. पक्षाचे काम करत राहिलो. आता पक्षाला वाटलं तेव्हा मला पुन्हा संधी दिली आहे. आमच्या पक्षात ओबीसी किंवा जात बघून उमेदवारी दिली जात नाही, असे बावनकुळे यांनी म्हंटले.
भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला भाजपने उमेदवारी दिली आहे. आता मी पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करणार आहे. पक्ष श्रेष्ठीने पुन्हा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मला तिकीट दिलं नव्हतं म्हणून भाजपला विधानसभेत फटका बसला असं म्हणता येणार नाही. त्याचं कारणं वेगळी आहेत.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी यशस्वी नेतृत्व केले आहे. भाजप पक्षासाठी त्यांनी केलेल्या यशस्वी कामामुळे बावनुकळेंना फळ मिळालेले आहे. त्यामुळे त्यांना नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.