हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महाभयंकर कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा वाढत असून सरकार कडुन कडक निर्बंध घातले जात आहेत. दरम्यान सरकारने सर्वांना मास्क घालणे अनिवार्य केले असून आता भाजप नेत्याने अजब वक्तव्य करून सर्वांचं लक्ष्य वेधलं आहे. मास्क घालू नका,मास्क घातलं तर ब्युटी पार्लर कस चालेल अस अजब वक्तव्य आसाम भाजप नेते हेमंत बिसवा सारमा यांनी केले आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केल आहे. ‘केंद्र सरकारने कोरोना नियमावली जाहीर केली आहे. परंतु आसामचा विचार करता, इथे कोरोनाचा धोका नाही. त्यामुळे इथे भीती पसरवण्याचं कारण नाही असं सरमा म्हणाले.’
सध्या अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील. त्यांचंही काम सुरू राहायला हवं.’ असं सरमा म्हणाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group