हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजपने बहुमतांचा आकडा पार केला असून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उत्तरप्रदेश हे राज्य भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
403 जागा असलेल्या उत्तरप्रदेश निवडणुकीत आत्तापर्यंत 362 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार भाजप 236, समाजवादी पक्ष 113, बसपा 6 तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपची वाटचाल ही एकहाती सत्तेच्या दिशेने निघाली आहे.
उत्तरप्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार लढाई पाहायला मिळली. अखिलेश यादव यांनी भाजपला कडवे आव्हान दिले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला प्रचार यामुळे भाजपला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.