हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी ट्विट करत भाजपकडे 2 मागण्या केल्या. यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर देत 5 प्रश्न विचारले आहेत.
केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना ५ सवाल केले आहेत. ‘उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे, अजान स्पर्धा घेणारे…टीपू सुलतान जयंती साजरी करणारे, आपल्या हिंदूहृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे, स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे, खरंच मराठी असतात का हो? या ५ प्रश्नांची उत्तर द्या एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?’ असा खोचक टोला केशव उपाध्ये यांनी राऊत यांच्यासह शिवसेनेला लागावला आहे.
उर्दूमध्ये होर्डिंग लावणारे…
अजान स्पर्धा घेणारे…
टीपू सुलतान जयंती साजरी करणारे…
आपल्या हिंदूहृदयसम्राट दैवताला जनाब म्हणणारे…
स्वतःच्या वसुलीसाठी पोलिस वापरणारे…
खरंच मराठी असतात का हो?
या ५ प्रश्नांची उत्तर द्या एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना? https://t.co/BTUL65t9uQ— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 8, 2021
संजय राऊतांनी नेमकी काय मागणी केली-
1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा..अशा 2 मागण्या संजय राऊत यांनी केल्या होत्या.