हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार वर टीका केल्यानंतर भाजपने देखील त्यांच्यावर पलटवार करताना राज्यातील ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.
@rautsanjay61 व @NANA_PATOLE हे लखीमपुरवरून टीका करत आहेत, ती चर्चा करूच पण महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? @OfficeofUT सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही 1/3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 4, 2021
संजय राऊत आणि नाना पटोले हे लखीमपुरवरून टीका करत आहेत, ती चर्चा करूच पण महाराष्ट्रातील शेतकरीद्रोही राज्य सरकारबद्दल कधी बोलणार? ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे हे सरकार.
मदत न देता पाठ फिरविणारे हे सरकार. मुख्यमंत्री तर बाहेर पडत नाहीतच पण पालकमंत्रीही साध भेटायला गेले नाहीत.
आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून,उस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे 2/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 4, 2021
मुख्यमंत्री तर बाहेर पडत नाहीतच पण पालकमंत्रीही साध भेटायला गेले नाहीत.आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून,उस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू सध्या सुरू आहे. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे असे केशव उपाध्ये यांनी म्हंटल.