हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं असलं तरी काँग्रेसची नाराजी सातत्याने समोर येत आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
“नाना पटोले काय ही तुमची अवस्था. काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर उद्धव ठाकरे , दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांची पाळत. फोन टॅप तरी काँग्रेस गप्प… ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं चित्र आहे हे,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी नाना पाटोळे याना टोला लगावला
@NANA_PATOLE नानाजी काय तुमची अवस्था? @INCIndia मुळे जे सत्तेत आहेत तेच प्रदेशाध्यक्षाविरोधात काम करीतआहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर @OfficeofUT @Dwalsepatil @AjitPawarSpeaks पाळत, फोनटॅप तरी कॅाग्रेस गप्प…
ना सत्तेत कॅाग्रेसला कोणी विचारत ना काँग्रेसमध्ये तुम्हालाअस चित्र आहे हे pic.twitter.com/y0fr6IS7HC— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे. मला महाराष्ट्र काँग्रेसमय करायचा आहे पण माझा फोन टॅप केला जात आहे. असे म्हणत जर समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही. असे नाना पटोले यांनी म्हंटल.