बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? भाजपचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्यावरून भाजपा नेते आता आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे? आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदिराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले.” असं ट्विट करत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधत कडक इशारा दिला आहे. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचं मला माहीत नाही. खरोखरच तसं काही झालं असेल तर त्याचं जशास तसं उत्तर मिळेल. हल्ला करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल,’ असं निलेश राणे यांनी म्हंटल.

काय आहे प्रकरण –

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नंतर हा वाद विकोपाला जाऊन काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment